अपघातात चुलत भावांचा मृत्यू, मांची फाट्यावर दुर्घटना

अपघातात चुलत भावांचा मृत्यू, मांची फाट्यावर दुर्घटना

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  कोल्हार-घोटी राज्य मार्गावर मांची फाटा येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास पिकअप, ट्रॅक्टर व दुचाकीच्या विचित्र तिहेरी अपघातामध्ये दोन तरुण चुलत भावांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. आकाश विलास कुळधरण व ऋषिकेश विजय कुळधरण (रा. वडगावपान) अशी अपघातातील मृत चुलत भावांची नावे आहेत. या अपघातामुळे वडगावपानसह परिसरात हळ-हळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत आश्वी पोलिसांनी सांगितले की, लोणीकडून संगमनेरच्या दिशेने येणारी पिकअप व मांची फाट्याकडे वळण घेणारा ट्रॅक्टर तर कोल्हार- घोटी राज्य मार्गाने जाणारी दुचाकीचा विचित्र तिहेरी अपघात झाला. ही माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलिस ठाण्याचे पो. नि. अरुण आव्हाड व सहकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, अपघातानंतर पिकअप चालक माहिती न देता पसार झाला, मात्र पो. नि. आव्हाड यांनी मांची फाट्यावर हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पिकअप चालकाचा शोध सुरु केला. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तालुका पोलिस तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news