नेवासा तालुक्यात ग्रामपंचायतींसाठी 574 अर्ज | पुढारी

नेवासा तालुक्यात ग्रामपंचायतींसाठी 574 अर्ज

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसी (शुक्रवारी) तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 69, तर 125 सदस्यपदांसाठी 505, असे एकूण 574 उमेदवारी विक्रमी अर्ज दाखल झालेत. चिंचबन ग्रामपचायत बिनविरोध झाली, तर हिंगोणीच्या सरपंचपदासाठीही एकमेव अर्ज दाखल झाला. 7 डिसेंबरला माघारीची मुदतीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
अखेरच्या दिवशी सदस्यपदांसाठी 372, तर सरपंचपदांसाठी 47 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामुळे सदस्यपदांसाठी एकूण 505, तर सरपंचपदांसाठी एकूण 69 उमेदवारी अर्ज दाखल झालेेत. यामध्ये चिंचबन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे चित्र आहे. येथे सरपंचपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला असून, सात सदस्यपदांसाठी सात अर्ज दाखल आहेत.

हिंगोणी ग्रामपंचायत सरपंचपदासाठीही एकमेव अर्ज दाखल झाला असला तरी येथे सात सदस्यपदांसाठी 17 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. सुरेशनगर ग्रामपंचायत सरपंचपदासाठी पाच, तर सात सदस्यपदांसाठी 24 अर्ज दाखल झालेत. हंडीनिमगाव ग्रामपंचायत सरपंचपदासाठी तीन, तर नऊ सदस्यपदांसाठी 21 अर्ज दाखल झालेत. खुपटी ग्रामपंचायत सरपंचपदासाठी आठ, तर नऊ सदस्यपदांसाठी 39 उमेदवारी अर्ज दाखल झालेत.

गोधेगाव ग्रामपंचायत सरपचपदासाठी चार, तर नऊ सदस्यपदासाठी 11 अर्ज दाखल आहेत. भेंडा खुर्द ग्रामपंचायत सरपंचपदासाठी 11, तर नऊ सदस्यपदांसाठी 49 अर्ज दाखल झालेत. अंमळनेर ग्रामपंचायत सरपंचपदासाठी चार, तर सदस्यपदांसाठी 20 अर्ज दाखल झालेत. शिरेगाव ग्रामपंचायत सरपंचपदासाठी पाच, तर सरदस्यपदांसाठी 37 अर्ज दाखल आहेत. कांगोणी ग्रामपंचायत सरपंचपदासाठी चार, तर 11 सदस्यपदांसाठी 45 अर्ज दाखल करण्यात आलेत.

वडाळा बहिरोबा ग्रामपंचायत सरपंचपदासाठी सात, तर 13 सदस्यपदांसाठी 57 अर्ज दाखल झालेत. माळीचिंचोरा ग्रामपंचायत सरपंचपदासाठी सात, तर 13 सदस्यपदासाठी 64 अर्ज दाखल आहेत.

अखेरच्या दिवशी माकासाठी 99 विक्रमी अर्ज
माका ग्रामपंचायत सरपंचपदासाठी नऊ, तर 13 सदस्य असलेल्या पदांसाठी सर्वाधिक 104 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. अखेरच्या दिवशी या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी विक्रमी 99 अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे येथे मोठी रंगत पहाला मिळणार आहे. परंतु, अखेरीच्या दिवशी कोण-कोण आपली उमेदवारी माघारी घेतो हेही पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Back to top button