शिर्डी : वर्षभरात साईचरणी 394 कोटींचे दान ; उद्या मंदिर राहणार रात्रभर उघडे

शिर्डी : वर्षभरात साईचरणी 394 कोटींचे दान ; उद्या मंदिर राहणार रात्रभर उघडे
Published on
Updated on

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  तिरूपतीनंतर श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे शिर्डीतील साईबाबांच्या झोळीत भक्तांनी वर्षभरात 394 कोटीचे दान टाकले. जानेवारी ते डिसेंबर या काळात 3 कोटी भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. कोरोनामुळे गत वर्षात मंदिर बंद होते. 7 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2021 या काळात मंदित खुले होते. गत वर्षात साईसंस्थानला 163 कोटीचे दान मिळाले होते. यंदाच्या वर्षी मात्र भक्तांनी विक्रमी 394 कोटी 28 लाखांचे दान केले. मंदिरात समाधीवर सुवर्णसिंहासन असून गाभार्‍याचा बहुतांश भाग सोन्याच्या पत्र्याने मढविण्यात आलेला आहे. बाबांची सर्वच अभूषणे ही सुवर्ण-हिरेजडीत आहेत.

क्रेडिट कार्डनेही दान

संस्थाकडे आजमितीला सुमारे 500 किलो सोने तर सव्वातीनशे किलो चांदी आहे. डेबिट-क्रेडीट कार्डने 40 कोटीचे दान संस्थानला प्राप्त झाले. मनी ऑर्डरने 1 कोटी 88 लाखाचे दान संस्थानला प्राप्त झाले.

मास्क वापरा…
कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने श्रीसाईभक्तांनी मास्कचा वापर करावा. भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन संस्थान प्रशासनाने केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news