अहमदनगर : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून अपघातग्रस्ताची मदत; रुग्णालायात केले दाखल | पुढारी

अहमदनगर : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून अपघातग्रस्ताची मदत; रुग्णालायात केले दाखल

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हार घोटी राज्य महामार्गावरील कोकणगाव शिवारातील निझर्नेश्वर फाट्याजवळ अपघात झाला. याच मार्गावरुन प्रवास करणाऱ्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अपघात झाल्याचे पाहून आपल्या वाहनांचा ताफा थांबवला. तसेच यावेळी विखे-पाटील यांनी अपघातातील जखमींना उपचारासाठी संगमनेर येथे हलवण्यास मदत केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, लोणीहून संगमनेरच्या दिशेने एक दुचाकीस्वार येत असताना निझर्नेश्वर फाट्याजवळ एक वृद्ध रस्ता ओलांडत होता. यावेळी दुचाकीस्वार स्वाराने त्या वृद्धाला जोराची धडक दिली. या अपघातात वृद्ध जागीच ठार झाला. तर दुचाकीस्वार सुद्धा गंभीर जखमी झाला.

अपघात झाला त्यावेळी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा संगमनेरकडे येत होता. त्यावेळी त्यांनी राज्य मार्गावर अपघात झाल्याचे पाहत असताना आपल्या वाहनचालकाला आपले वाहन बाजूला घेण्यास सांगितले. तसेच विखे-पाटील यांनी स्वतः खाली उतरून मदत कार्य करत जखमीला तात्काळ उपचारासाठी संगमनेरला हलविण्यास सांगितले. जखमी दुचाकीस्वारावर कुटे हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button