Kapil Dev advice : मुलांच्‍या वाढत्‍या लठ्ठपणावर कपिल देव यांचा सल्‍ला, "मुलांना मोबाईल फोनपासून" | पुढारी

Kapil Dev advice : मुलांच्‍या वाढत्‍या लठ्ठपणावर कपिल देव यांचा सल्‍ला, "मुलांना मोबाईल फोनपासून"

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मुलांमध्‍ये लठ्ठपणाची समस्‍या वाढत आहे. यावर भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी पालकांना सल्‍ला दिला आहे. तुम्‍ही तुमच्‍या शरीरासाठी दिवसभरात एक ते दोन तास देऊ शकत नसाल तर ही तुमची
समस्‍या आहे, असेही त्यांनी स्पष्ट केली. ( Kapil Dev advice )

Kapil Dev advice : मुलांना मैदानात भरपूर खेळू द्या

नोवो नॉर्डिस्क इंडियाचे कंपनीच्‍या टाईप-२ मधुमेह आणि वाढत्‍या वजनांवर प्रबोधन करण्‍यासाठी मोहिम सुरु केली आहे. या निमित्त आयोजित कार्यक्रमात कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर कपिल देव म्‍हणाले की, “आज लोक बुद्धिमान आहेत. त्‍यामुळे मला कोणालाही सांगण्‍याची गरज नाही. मात्र काहीवेळा लोक आपल्‍या आरोग्‍याबाबत जागृक नसतात. भारतीय मुलांमधील वाढता लठ्ठप‍णा ही गंभीर समस्‍या हेात आहे. यासाठी पालकांनी मुलांनी मोबाईल फोनपासून लांब ठेवावे त्‍यांना मैदानात भरपूर खेळू द्या. याचा खूपच फायदा होईल.”

 वजन आणि मधुमेहाची ‘भागीदारी’ रूग्णांसाठी हानिकारक

‘ब्रेक द पार्टनरशिप’ #WeightinDiabetes मोहीम वजन कमी करणे आणि टाईप -२ मधुमेहाबाबत जागृकता निर्माण करण्‍यावर काम करते. मधुमेह आणि वजन यांचा परस्‍पर संबंध आहे. याकडे गांभीयांने पाहण्‍याची गरज आहे. क्रिकेटमध्‍ये दोन फलंदाजांमधील भागीदारी ही विरोधी संघासाठी खूपच धोकादायक ठरु शकते. त्‍यामुळे गोलंदाज अशी भागीदारी संपविण्‍याचा प्रयत्‍न करत असतात. त्‍याचप्रमाणे वजन आणि मधुमेहाची भागीदारी रूग्णांसाठी हानिकारक असू शकते. यावर वेळीच नियंत्रण मिळवणे आवश्‍यक आहे, असेही कपिल देव यांनी स्‍पष्‍ट केले.

मला स्‍वत:ला टाईप 2 मधुमेह आहे. त्‍यामुळे मला याचे परिणामांची माहिती आहे. जर आपण वेळीच उपाययोजना केल्‍या तसेच योग्य औषधांचे नियमित सेवन केले तर टाईप २ मधुमेहावर नियंत्रित मिळवता येतो, असेही त्‍यांनी यावेळी नमूद केले.

 

 

Back to top button