नेवासा : शेळ्या, बोकड चोरीस | पुढारी

नेवासा : शेळ्या, बोकड चोरीस

नेवासा : तालुक्यातील पिचडगाव येथे अज्ञात चोरट्यांनी 34 हजारांच्या शेळ्या व बोकड चोरून नेल्याची घटना शनिवारी पहाटे उजेडात आली. नेवासा पोलिस ठाण्यात पिचडगाव येथील शेतकरी भाऊसाहेब दत्तू बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवारी (दि.18) रात्री 9 च्या दरम्यान घरासमोरील शेडमध्ये 7 शेळ्या व 1 बोकड यांना चारा टाकून घरासमोर झोपलो होतो.

शुक्रवारी पहाटे 5 वाजता शेडमध्ये साफसफाई करण्यासाठी गेलो असता, त्याठिकाणी 7 शेळ्या व 1 बोकड दिसला नाही. अज्ञात चोरट्यांनी 34 हजाराची चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button