‘गौण खनिज प्रकिया ऑनलाईन करणार’ : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील | पुढारी

‘गौण खनिज प्रकिया ऑनलाईन करणार’ : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी तसेच उत्खननापासून वाहतुकीपर्यंतच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले. गौण खनिज आणि त्यापासून तयार केलेल्या उपपदार्थांच्या वाहतुकीबाबत बैठक महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार धैर्यशील माने, आमदार जयकुमार गोरे यांच्यासह कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ना. विखे पाटील म्हणाले की, अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक हा सातत्याने कळीचा मुद्दा ठरला आहे. अनेकदा उत्खननावर आळा घालणार्‍या महसूल अधिकारी, कर्मचार्‍यांवर हल्लेही झाले आहेत. अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया आणली जाणार आहे. ही प्रक्रिया सुलभ करण्याबरोरबच महसूल विभागास याचे नियंत्रण करण्यास सोपे होणार आहे.
गौण खनिज उत्खनन ऑनलाईन झाल्यामुळे अवैध गौण खनिज वाहतुकीला चाप लावणे अधिक सोपे होणार आहे.

Back to top button