नगर : अल्पवयीन मुलीस पळवून अत्याचार करणारा अटकेत

नगर : अल्पवयीन मुलीस पळवून अत्याचार करणारा अटकेत
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीला दि.31 ऑक्टोबर रोजी फूस लावून पळवून नेल्याबाबतचा गुन्हा भिंगार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याची संवेदनशीलता लक्षात घेवून पोलिसांनी तत्काळ एक पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले होते. संबंधित अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्यावर अत्याचार करणार्‍या आरोपीस भिंगार पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंड येथून ताब्यात घेतले आहे.

योगेश कचरू गायकवाड (वय 20, रा.फुलसौंदर मळा, बुरूडगाव रोड, ता.जि. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर वाढीव कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, न्यायालयात त्याला हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्यानंतर दोघेही सांगली जिल्ह्यात असल्याची माहिती भिंगारचे सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना मिळाली होती.

त्यानुसार, पोलिस उपनिरीक्षक शितल मुगडे, हेड कॉन्स्टेबल रेवननाथ दहीफळे, कॉन्स्टेबल रमेश दरेकर यांनी आरोपी व पीडित मुलीला सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंड येथून ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news