सोनई : पांढर्‍या सोन्याच्या 21 गोण्या पळविल्या | पुढारी

सोनई : पांढर्‍या सोन्याच्या 21 गोण्या पळविल्या

सोनई : पुढारी वृत्तसेवा :  सोनई जवळील श्रीरामवाडी येथील एका शेतकर्‍याच्या घरासमोरून 36 हजार रुपये किमतीच्या कापसाच्या 21 गोण्या चोरट्याने चोरून नेल्या. सोनई पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन चोरटे पकडले. श्रीरामवाडी येथील शेतकरी अरुण गंगाधर बेल्हेकर यांनी शेतातील कापूस वेचून गोण्या भरून घराजवळच्या शेडमध्ये ठेवल्या होत्या. सकाळी गोण्या कमी दिसल्याने 7 नोव्हेंबर रोजी पोलिस ठाणे गाठले.

6 नोव्हेंबर रात्री 11 ते 7 नोव्हेंबर रोजी सकाळी आठपर्यंत घरासमोरील शेडमधून 36 हजार रुपयांचा 400 किलोग्राम वजनाच्या 21 गोण्या प्रतिक्विंटल नऊ हजार रुपयेप्रमाणे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची बेल्हेकर यांनी फिर्याद दिली आहे. सोनई पोलिसांनी गुन्हा रजिष्टर नंबर 376/2022 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला. या घटनेचा सोनई पोलिसांनी तपास करून सचिन सीताराम तागड वय 20 रा. श्रीरामवाडी. सोनई व योगेश रंगनाथ मोरे वय 22 लोहगाव रोड सोनई यांना अटक केली असून आज न्यायालयाने आरोपींना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल अकोलकर हे करत आहे

Back to top button