नेवासा : भंगाराचा ट्रक उलटल्याने महामार्ग ठप्प! | पुढारी

नेवासा : भंगाराचा ट्रक उलटल्याने महामार्ग ठप्प!

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : नगरहून- औरंगाबादकडे भंगार घेऊन जाणारा ट्रक कांगोणी फाट्यावर उलटला. या कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी महामार्गावरी वाहतूक ठप्प झाली होती. मागून येणार्‍या वाहनाला साईड देताना अंदाज न आल्यामुळे ट्रक रस्ता दुभाजकावर आदळला. ही घटना रविवार (दि.6) रोजी चार वाजता घडली.

या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शनिशिंगणापूर पोलिस उशिराने घटनास्थळी दाखल झाल्यामुळे अपघातग्रस्त ट्रक बाजूला घेण्यास विलंब झाला. त्यामुळे पोलिसांबाबत वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे.पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

Back to top button