नगर : एस्कॉर्ट संकेतस्थळावर महिलेची केली बदनामी

नगर : एस्कॉर्ट संकेतस्थळावर महिलेची केली बदनामी
Published on: 
Updated on: 

नगर; पुढारी वृत्तसेवा : एस्कॉर्ट संकेतस्थळावर नगरमधील उपनगरात राहणार्‍या एका महिलेचे बनावट अकाऊंट तयार करुन त्याद्वारे तिची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने रविवारी (दि. 6) सायबर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.

पीडित महिलेला तिच्या व्हॉटस् अ‍ॅपवर एक मेसेज आला. त्या मेसेजवरून पीडितेला एका संकेतस्थळावर आपल्या नावाच्या पुढे कॉलेज गर्ल पुणे, असे लिहून बनावट अकाऊंट तयार केल्याचे समजले. या अकाऊंटवर संबंधित महिलेचा व्हॉटस् अ‍ॅप क्रमांक टाकल्याचे दिसून आले. त्यानंतर महिलेने सायबर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन सदर महिलेच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करणार्‍या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news