निवडुंगेत चोरट्यांचा धुमाकूळ | पुढारी

निवडुंगेत चोरट्यांचा धुमाकूळ

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील निवडुंगे शिवारात शुक्रवारी रात्री अविनाश बाबुराव घोडके, त्यांची पत्नी व मुलाला चौघांनी बेदम मारहाण करून 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळ सूत्र चोरून नेल्याची घटना घडली. दरम्यान, या चोरीच्या घटनेमुळे परिसरात सर्वत्र भीतीच वातावरण पसरले आहे. शुक्रवारी दि. 4 नोव्हेंबर रोजी 10 वाजेच्या सुमारास अविनाश घोडके व त्यांचे कुटुंबीय दैनदिन काम करत होते.

त्याचवेळी त्या ठिकाणी चार अज्ञात चोरांनी येऊन घोडके कुटुंबियांना बेदम मारहाण केली. अविनाश घोडके यांची पत्नी व मुलाला मारहाण करून 28,000 हजार रुपये किमतीचे 7 ग्रॅम वजनाचे दोन पळ्या असलेले सोन्याचे मणीमंगळसूत्र असा मुद्देमाल चोरट्यांनी बळजबरीने ओढुन चोरून नेला. या जबरी चोरीबाबत अविनाश घोडके यांच्या फिर्यादीवरून भादवि कलम 394 व 34 प्रमाणे पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक कौशलराम निरंजन वाघ हे करत आहेत.

Back to top button