जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिंतुर तालुक्यातील परतीच्या पावसाने केलेल्या शेती नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत स्थानिक आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, तहसीलदार सखाराम मांडवगडे, गटविकास अधिकारी मोरे, तालुका कृषी अधिकारी शंकर काळे, नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
तालुका कृषी अधिकारी शंकर काळे यांनी तालुक्यातील सरासरी अंदाजे 35 ते 40 हजार हेक्टर परतीच्या पावसाने शेती पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. दुधगाव मंडळाचे ६ कोटी रुपये यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच जवळपास तालुक्यातून पीक विम्याच्या 51 हजार तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती कृषी अधिकारी काळे यांनी दिली.
25 टक्के सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी मालेगाव येथील महिला शेतकरी मीना भगवान सानप यांच्या शेतातील तूर आणि सोयाबीन पीक नुकसानीची पाहणी केली. तसेच रोहयो योजनेअंतर्गत मालेगाव येथील महादेव नागोराव सानप यांच्या पेरू आणि आशामती महादेव सानप यांच्या सीताफळ या लागवड केलेल्या फळबागेची कृषीमंत्री सत्तार यांनी पाहणी केली.
हेही वाचलंत का ?