कर्जतमध्ये आमदार रोहित पवार यांचे बॅनर फाडले; सोशल मीडियावर तीव्र निषेध | पुढारी

कर्जतमध्ये आमदार रोहित पवार यांचे बॅनर फाडले; सोशल मीडियावर तीव्र निषेध

कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांचा फलक कर्जत मध्ये फाडण्याची खळबळजनक घटना घडली आहे. आमदार रोहित पवार यांच्या विकास कामांची माहिती देणारा सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत यांच्या कार्यालयाबाहेर लावलेला फलक अज्ञात व्यक्तीने फाडला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असूनयाचे पडसाद सोशल मीडियावर सध्या उमटताना दिसत आहेत.

Back to top button