नगर: पत्नीला मारहाण ; पत्नीविरुद्ध गुन्हा | पुढारी

नगर: पत्नीला मारहाण ; पत्नीविरुद्ध गुन्हा

नगर तालुका : गर्भवती पत्नीला पतीने मारहाण करून जखमी केले. अंकिता सुनील लगड (वय 22 रा. भिस्तबाग चौक, सावेडी), असे जखमी पत्नीचे नाव आहे. तिच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, तिने तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पती सुनील प्रकाश लगड याच्याविरोधात शनिवारी (दि. 17) गुन्हा दाखल करण्यात आला. 10 सप्टेंबरला रात्री अंकिताचा पती सुनील दारू पिऊन घरी आला. त्यावेळी अंकिताने ‘तुम्ही आज पण दारू पिवून आले का,’ असे म्हणताच सुनीलला राग येवून त्याने अंकिताला दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

Back to top button