संगमनेर : धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद | पुढारी

संगमनेर : धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द शिवारात गेल्या आठ दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात जेरबंद झाला आहे. गेली 8 दिवसांपासून बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली होती. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या कित्येक दिवसांपासून धांदरफळ खुर्द येथील कहार वस्तीमध्ये नित्यनेमाने बिबट्याचे दर्शन होत असल्याचे चित्र येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप कचेरे यांच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे निदर्शनास आले आहे.

बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे वनविभागाने तातडीने बिबट्या जेरबंद करण्यासाठी कहार वस्ती धांदरफळ खुर्द येथे नुकताच काही दिवसापूर्वी पिंजरा लावला. या पिंजर्‍यात अलगदपणे अडकला गेला. यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Back to top button