राहुरी : कामगारानेच मारला दुकानात डल्ला | पुढारी

राहुरी : कामगारानेच मारला दुकानात डल्ला

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : दुकानात नोकरीस असलेल्या कामगारानेच काऊंटरमधील गल्ल्यातून 12 हजार रुपये रोख रक्कम चोरल्याची घटना तालुक्यातील वांबोरी येथील एका दुकानात घडली.  लक्ष्मण केरूजी पळसकर, (रा. वांबोरी राहुरी रोड) यांचे वांबोरी येथील बाजारपेठेत साई समर्थ सेल नावाचे हार्डवेअरचे दुकान आहे.

त्यांच्या दुकानात शंकर कडूभाऊ दारकुंडे (मूळ रा. नेवासा, हल्ली रा. वांबोरी, ता. राहुरी) हा तरूण कामाला होता. त्याने लबाडीच्या इराद्याने काऊंटरमधून 12 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेले.  लक्ष्मण केरूजी पळसकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी शंकर कडूभाऊ दारकुंडे याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.  या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक पालवे हे करीत आहेत.

Back to top button