ब्राह्मणवाडा आश्रमात मूर्तीसह दागिने चोरी | पुढारी

ब्राह्मणवाडा आश्रमात मूर्तीसह दागिने चोरी

बोटा : पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्यातील पठार भागातील ब्राह्मणवाडा येथील मुकुंद आश्रमातील फुलारी श्रीकृष्ण मूर्ती व दागिने अज्ञात चोरट्याने मंगळवारी (दि. 6) सकाळी वाजेच्या सुमारास चोरी झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत अकोले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ब्राह्मणवाडा येथील मुकुंद आश्रमातील फुलारी श्रीकृष्ण मूर्ती व दागिने असा एकूण पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लांबविला आहे.

याप्रकरणी दत्तराज फाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथून घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक तळपे हे करत आहे. दरम्यान, सदर मूर्ती व दागिने आढळल्यास तत्काळ फाटे महाराज अथवा पोलिसांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथून घुगे यांचे मार्गदर्शन पोलीस नाईक तळपे करत आहे. दरम्यान, पठार भागात अनेक छोट्या मोठ्या चोर्‍या होत आहे. यापूर्वी देखील घरफोडी सारख्या अनेक घटना घडल्या आहेत. परंतु या चोरांचा तपास लागलेला नाही.

Back to top button