अपघातात सात वर्षीय बालकाचा मृत्यू | पुढारी

अपघातात सात वर्षीय बालकाचा मृत्यू

नगर : पुढारी वृत्तसेवा : बोल्हेगाव फाटा येथे नगर- मनमाड रोडवर झालेल्या अपघातात सारसनगरमधील शर्विल मुक्ताजी ससाणे (वय 7) या बालकाचा मृत्यू झाला आहे. शर्विल व त्याचा भाऊ आईबरोबर दुचाकीवरून जात असताना एका मालवाहू वाहनाने धडक दिली. शनिवारी दुचारी ही घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

Back to top button