राहुरीः नागरिकांनी चोरट्यास रंगेहाथ पकडले | पुढारी

राहुरीः नागरिकांनी चोरट्यास रंगेहाथ पकडले

राहुरीः राहुरी शहरातील मठगल्ली परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास चोरीचा प्रयत्न करत असताना सतीश धोत्रे या भामट्याला रंगेहाथ पकडण्यात आले. परिसरातील नागरिकांनी त्याची यथेच्छ धुलाई करून पोलिसांच्या ताब्यात दिले. ईश्वर गोपीनाथ जाधव (वय 34, रा. कैकाडीवाडा, रा. राहुरी) हा तरुण काल (दि. 28) रोजी नेहमीप्रमाणे जेवण करून झोपी गेला होता.

मध्यरात्री दीड वाजे दरम्यान त्याला आवाज आला. तो उठून घराबाहेर आला. त्यावेळी शेजारी मामा बाळासाहेब सूर्यभान गायकवाड याच्या घराचा दरवाजा एक भामटा कटावणीच्या सहाय्याने तोडण्याचा प्रयत्न करत होता. ईश्वर जाधव याने त्या भामट्याला चोरीचा प्रयत्न करीत असताना रंगेहाथ पकडून आरडाओरडा केला. तेव्हा परिसरातील नागरिक जागे झाले. त्यांनी त्या भामट्याची यथेच्छ धुलाई करून पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्या भामट्याला ताब्यात घेतले.

Back to top button