नगर : बनावट आदेश देऊन फसवणूक, कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल | पुढारी

नगर : बनावट आदेश देऊन फसवणूक, कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नगर : न्यायाधीशांची खोटी सही करून बनावट आदेश तहसीलदारांना सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकार्‍यांच्या आदेशानुसार पाच जणांविरूद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे अधीक्षक रमेश अनंत नगरकर यांनी फिर्याद दिली आहे.

राधाकिसन रभाजी काळे, प्रकाश रभाजी काळे, अनिल रभाजी काळे, विष्णू रभाजी काळे, राहिबाई रभाजी काळे, (सर्व रा. देहरे, ता. नगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाचा बनावट आदेश तयार करून तहसीलदारांना सादर करण्यात आल्याचा प्रकार 28 ऑक्टोबर 2015 रोजी घडला होता. हा प्रकार आता उघडकीस आला असून आरोपींविरूद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Back to top button