नगर : बसस्थानकातून लॅपटॉप लांबविला | पुढारी

नगर : बसस्थानकातून लॅपटॉप लांबविला

नगर : शहरातील स्वास्तिक चौकातील पुणे बसस्थानकातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तीस हजार रुपये किमतीचा लॉपटॉप चोरून नेला. ही घटना 5 जुलै रोजी सकाळी घडली. याबाबत रवींद्र गणेश काशीद (रा. चिखली, ता. धारूर, बीड) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार ढगे करीत आहेत. दरम्यान, पुणे, माळीवाडा बसस्थानकातून चोर्‍याचे प्रमाण वाढले आहेत. त्याचबरोबर एसटी बसमध्ये लूट करणारीही टोळी कार्यरत आहेत. बसमधून रोकड चोरीला गेल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.

Back to top button