कांदा 1 हजार 600 रुपयांवर तर हरभरा 4300, सोयाबीन 6100, मका 2000 | पुढारी

कांदा 1 हजार 600 रुपयांवर तर हरभरा 4300, सोयाबीन 6100, मका 2000

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याची आवक सुरू झालेली आहे.काल कांदा गोणी मार्केटमध्ये 20 हजार 583 कांदा गोणींची आवक झाली. एकूण 11345 क्विंटल कांद्याची आवक झाली.
एक नंबर कांद्याला 1000 ते जास्तीत जास्त 1600 रु. क्विंटल, दोन नंबर कांद्यास 700 ते 950 व तीन नंबर कांद्यास 350 ते 650 क्विंटल तसेच गोल्टी कांदा कमीत कमी 750 ते जास्तीत जास्त 1050 रुपये बाजारभाव निघाले.

शेतकर्‍यांनी आपला कांदा मार्केटमध्येच विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव किशोर काळे यांनी केले आहे.
भुसार मार्केटमध्ये गव्हाची 16 क्विंटल आवक झाली. 1900 ते 2250 भाव मिळाला. सरासरी 2100 भाव मिळाला. हरभरा या शेतमालाची 48 क्विंटल आवक झाली. 4000 ते 4300 व सरासरी रुपये 4125 भाव निघाले. सोयाबीन या शेतमालाचे 19 क्विंटल आवक झाली. 5900 ते 6100 व सरासरी 6000 भाव निघाले. मका 2 क्विंटल आवक झाली. 2000 बाजारभाव निघाले.

बाजरी शेतमालाचे 4 क्विंटल आवक झाली रुपये 1300 ते 1750 बाजारभाव निघाले. बाजरीची 4 क्विंटल आवक होऊन 1300 ते 1600 भाव निघाले. तूर शेतमालाचे 6 क्विंटल आवक होऊन 5500 भाव मिळाला. बटाट्याची 249 क्विंटल आवक झाली. कमीत कमी 15 रुपये व जास्तीत जास्त 20 रुपये किलो व सरासरी 17 रुपये किलो या दराने निघाले.

हिरवी मिरची या शेतमालाचे 23 क्विंटल आवक झाली. कमीत कमी 30 रुपये किलो, जास्तीत जास्त 40 रुपये किलो व सरासरी 35 रुपये किलो या दराने निघाले. टोमॅटो या शेतमालाचे 26 क्विंटल आवक झाली. कमीत कमी 20 रुपये किलो, जास्तीत जास्त 30 रुपये किलो व सरासरी 25 रुपये किलो या दराने निघाले. शेतकर्‍यांनी आपला कांदा तसेच भुसार माल स्वच्छ करून बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button