कणगर येथे 65 हजारांची चोरी | पुढारी

कणगर येथे 65 हजारांची चोरी

राहुरी : रात्रीच्या दरम्यान चोरट्यांनी घरात घूसून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सुमारे 65 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केल्याची घटना राहुरी तुूक्यातील कणगर येथे दिनांक 28 जून रोजी घडली. आप्पासाहेब ज्ञानदेव नालकर, (वय 32) हे राहुरी तालूक्यातील कणगर येथे रहावयास आहेत.

दिनांक 28 जून रोजी रात्री दहा ते 29 जून रोजी पहाटे साडेतीन वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दरवाजा लोटून घेतलेल्या घरात प्रवेश केला. घरातील सामान अस्ताव्यस्त करून कपाटाची उचकापाचक केली. तेव्हा कपाटातील 62 हजार रूपये किंमतीचे 26 ग्रॅम वजनाचे मणीमंगळसूत्र, कानातील झूबे, वेल, बाळी व सटूबाई असे सोन्याचे दागिने लांबविले.

Back to top button