नगर : पैसे मोजून बुस्टर डोस घेण्यास अल्प प्रतिसाद | पुढारी

नगर : पैसे मोजून बुस्टर डोस घेण्यास अल्प प्रतिसाद

नगर : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचा बुस्टर डोस घेण्यासाठी जवळपास चारशे रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे गोरगरिब जनतेने त्याकडे दुर्लक्ष केले. आजमितीस जिल्ह्यातील फक्त 287 नागरिकांनी पैसे अदा करुन बुस्टर डोस घेतला.

हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, शिंदेंच्या शपथविधीनंतर उद्धव ठाकरेंचा दावा

पैसे देऊन बुस्टर डोस घेण्यास कोणी प्रतिसाद देत नसल्यामुळे जिल्ह्यातील एकाही खासगी रुग्णालयांत बुस्टर डोस उपलब्ध नाही. मात्र, 60 वर्षांवरील वयोमान असलेल्या 84 हजार 987 नागरिकांनी मोफत डोस घेतला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 16 जानेवारी 2021 पासून लसीकरण मोहिम हाती घेतली. नागरिकांसाठी शासकीय रुग्णालयांत दोन्ही डोस मोफत उपलब्ध करण्यात आले. खासगी रुग्णालयांत देखील पैसे देऊन डोस उपलब्ध केले जात होते. दोन्ही डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना नऊ महिन्यानंतर खबरदारी म्हणून बुस्टर डोस (तिसरा डोस) उपलब्ध केला आहे. मात्र, 18 ते 59 वयोगटातील नागरिकांसाठी बुस्टर डोस मोफत न देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यासाठी खासगी रुग्णालयांना लस उपलब्ध केली.

नुपूर शर्मानं टीव्हीवर जाऊन संपूर्ण देशाची माफी मागावी, वादग्रस्त वक्‍तव्यप्रकरणी सुप्रीम कोर्टानं फटकारलं

प्रारंभी नगर शहरातील नोबेल, साईदीप व स्वास्थ्य या तीन खासगी रुग्णालयांत बुस्टर डोस उपलब्ध होते. या रुग्णालयांतून आतापर्यंत 18 ते 45 वयोगटातील 219 व 45 ते 59 वयोगटातील 68 नागरिकांनी बुस्टर डोस पैसे अदा करुन घेतला आहे. 60 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या 58 हजार 240 नागरिकांनी शासकीय रुग्णालयांत मोफत बुस्टर डोस घेतला आहे. पैसे देऊन बुस्टर डोस घेण्यास कोणी पुढे येईनात म्हणून या तीनही रुग्णालयांनी बुस्टर डोस ठेवणे बंद केले आहे. आजमितीस एकाही खासगी रुग्णालयांत बुस्टर डोसची सुविधा उपलब्ध नाही.

 मी पळपुटा नाही म्हणत संजय राऊत ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर 

85 हजार जणांनी घेतला खासगीत डोस

18 वर्षापेक्षा अधिक वयोमान असलेल्या जिल्ह्यातील 55 लाख 97 314 नागरिकांनी लसीकरण केले. यामध्ये 30 लाख 81 हजार जणांनी पहिला तर 24 लाख 30 हजार 290 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत 18 वर्षांपासून पुढे वयोमान असलेल्या 85 हजार 274 नागरिकांनी बुस्टर डोस घेतलेला आहे. यामध्ये 14 हजार 459 हेल्थ वर्कर व 12 हजार 288 फ्रन्टलाईन वर्करचा समावेश आहे. या दोन्हींना मोफत डोस दिला जात आहे.

एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा! शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Back to top button