नगर : महामार्ग विभाग, ठेकेदाराला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश | पुढारी

नगर : महामार्ग विभाग, ठेकेदाराला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश

पाथर्डी शहर : पुढारी वृत्तसेवा : कल्याण – निर्मल (विशाखापट्टणम) राष्ट्रीय महामार्ग अर्धवट रस्त्याच्या कामाबाबत औरंगाबाद खंडपीठाने दाखल झालेल्या याचिकेवर चार आठवड्यांच्या आत या रस्त्याच्या कामाबाबत प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.

सरकार स्थापनेसाठी भाजपकडून वेगाने हालचाली, फडणवीस दिल्लीला रवाना

रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61च्या कामाची प्रगती, तसेच कामाचे पूर्णत्वासह चार आठवड्यात उर्वरित काम पूर्ण करण्याचे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान दिले आहेत.यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाने याचिकेत सामाविष्ट रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाबाबत म्हणणे सादर न करता अमरापूर – आष्टी या राज्य मार्गाचे म्हणणे सादर केल्याचे याचिका कर्त्यांंचे वकील अ‍ॅड.अनिरुद्ध निंबाळकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

एकनाथ शिंदे गुवाहाटीत पहिल्यांदाच मीडियासमोर, संपर्कातील आमदारांची नावे सांगा, ठाकरेंना दिले आव्हान

यावेळी उपविभागीय अभियंता पुढील दोन आठवड्यात राष्ट्रीय महामार्गा 61 च्या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करतील, असे सरकारी वकील डी.आर.काळे यांनी न्यायालयास सांगितले. याशिवाय भारतीय राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे चार आठवड्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्याबाबत आतापर्यंत काय कार्यवाही केली, तसेच रखडलेले काम कधी पूर्ण होणार, याशिवाय पुढील सुनावणीपर्यंत महामार्गाचे उर्वरित काम पूर्ण करण्याबाबत योग्य पाऊले उचलण्या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. डी. धाणुका, न्यायमूर्ती अनिल एल.पानसरे यांनी आदेश दिले आहेत. जनहित याचिकाकर्ते मुकुंद गर्जे यांच्यातर्फे अ‍ॅड. अनिरुद्ध निंबाळकर, अ‍ॅड. रतन आढे व अ‍ॅड. हरिहर गर्जे यांनी काम पाहिले.

Anand Mahindra qualification : आनंद महिंद्रांना नेटकर्‍याने विचारलं, तुमचं शिक्षण किती? ; उत्तराने सर्वांची मने जिंकली

‘कोणीच जुमानत नसल्याने न्यायालयात’

या राष्ट्रीय महामार्गावरील फुंदेटाकळी फाटा ते मेहकरी फाटा रस्त्याचे काम पाथर्डी हद्दीमध्ये गेल्या सहा वर्षांपासून चालू आहे. सध्या सर्वच ठिकाणी काम बंद आहे. रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट आहे. दररोज छोटे – मोठे अपघात होऊन आतापर्यंत अनेक निरपराधांना प्राण गमवावे लागलेे. अनेकांना कायमचे अपंगत्व आले. आज, ही प्रत्यक्षात पाहिले तर अनेक ठिकाणी रस्त्याच्या मध्यावर मोठ-मोठे खड्डे आहेत. या रस्त्याच्या कामासाठी सर्वांनीच आंदोलने करूनही अधिकार्‍यांना काहीच फरक पडला नाही. आमदार-खासदारांच्या आदेशाला संबंधित अधिकार्‍यांनी जुमानले नाही. त्यामुळे न्यायालयात दाद मागितली, असे मुकुंद गर्जे यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे समर्थक ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

उच्च न्यालयाने आदेशात काय म्हटले

प्रतिवादींनी चार आठवड्यांच्या आत प्रतिज्ञापत्र उत्तरात न चुकता दाखल करण्याचे निर्देश दिले असून, प्रतिवादी राष्ट्रीय महामार्ग 61चे आजपर्यंतच्या भागाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी उचललेली पावले आणि त्या भागाचे बांधकाम केव्हा पूर्ण होईल असे उत्तरात प्रतिज्ञापत्रात सूचित केले आहे. येथे योग्य ती पावले उचलतील का, शिल्लक कामाचा भाग पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर आणि पुढील तारखेपूर्वी काम आणि ते उत्तरात प्रतिज्ञापत्रात रेकॉर्डवर ठेवा, असे आदेशात म्हटले आहे. पुढील सुनावणी 29 ऑगस्ट रोजी आहे.

Back to top button