नगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास | पुढारी

नगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास

नगर : पुढारी वृत्तसेवा : सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश एस.व्ही. सहारे यांनी आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. इलियास इब्राहीम शेख (60, रा. मस्तान शहा दर्गामागे, फलटण चौक, कोठला) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नांदेड : लग्नात सोफासेट दिला नाही म्हणून पत्नीला पाजले विष

जानेवारी 2018 रोजी पीडित मुलगी आरोपीच्या घरासमोरून जात असताना आरोपीने मुलीला घरामध्ये ओढून तिच्यावर अत्याचार केले. याबाबत मुलीच्या आईने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सणस यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

हमालीसाठी आता जादा पैसे रेल्वे स्थानकावरील ‘कुलीं’च्या सेवा दरात वाढ

जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांनी आरोपीस तीन वर्षे सक्त मजुरी तसेच सात हजार 500 रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. खटल्यात पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती. तर पीडित मुलगी, तिची मैत्रिण व फिर्यादी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या होत्या. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने अति. सरकारी अभियोक्ता विष्णुदास के. भोर्डे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी व्ही. व्ही. साठे यांनी सहाय्य केले.

Back to top button