राज ठाकरेंच्या आरोग्यासाठी मोहटादेवीला साकडे | पुढारी

राज ठाकरेंच्या आरोग्यासाठी मोहटादेवीला साकडे

पाथर्डी शहर : पुढारी वृत्तसेवा
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाली असून, त्यांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी चरणी प्रवक्ते प्रकाश महाजन यांच्या हस्ते आरती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष खेडकर म्हणाले, पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांच्या हस्ते मोहटा देवीची पूजा आरती करून देवीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.

रत्नागिरी : तटरक्षक दल फायरमन पदाच्या परीक्षेसाठी बनावट कागदपत्रे, तिघांविरोधात गुन्हा

राज ठाकरे यांना उत्तम व चांगलं दीर्घाआयुष्य मिळावे, पुन्हा सर्व कार्यकर्त्यांना राज ठाकरे त्यांचे मार्गदर्शन लाभो. त्यांच्या विचाराने कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी प्राप्त होते. सध्या ते रुग्णालयात आहे रुग्णालयातून लवकर बाहेर येतील. याप्रसंगी तालुका अध्यक्ष संतोष जिरेसाळ, परिवहन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पालवे, मोहटा देवस्थानचे विश्वस्त डॉ. ज्ञानेश्वर दराडे, गणेश रांधवणे, लक्ष्मण डांगे आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

मामा महाजन-भाची मुंडे यांच्यात चर्चा
भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे याही मोहटादेवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या, याठिकाणी पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांची भेट झाली. यावेळी मामा महाजन व भाची मुंडे यांच्यात चर्चा झाली. यांच्यात काय चर्चा झाली, याचा मात्र तपशील मिळू शकला नाही.

Back to top button