सांगली : कुपवाडमध्ये दोन कुटुंबांत हाणामारी | पुढारी

सांगली : कुपवाडमध्ये दोन कुटुंबांत हाणामारी

कुपवाड ; पुढारी वृत्तसेवा : लोखंडी पाईप घरावर पडल्याच्या कारणावरून शहरात दोन कुटुंबांत लोखंडी पाईपने हाणामारी झाली. यात चारजण जखमी झाले आहेत. दोन्ही कुटुंबांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.

पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदाशिव बसाप्पा खोत, शोभा सदाशिव खोत, रमेश महादेव गुरव, शालन महादेव गुरव ( सर्व रा. शांत कॉलनी, कुपवाड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : विजय गुरव रविवारी दुपारी त्यांच्या घरावर सोलर बसवित होते. यावेळी प्लंम्बिगची पाईप शेजारचे सदाशिव खोत यांच्या घराच्या पत्र्यावर पडली. यात पत्रा फाटला. त्यामुळे सदाशिव खोत यांनी विजय गुरव यांना शिवीगाळ केली. गुरव यांनी खोत यांना शिवीगाळ करू नका, असे सांगत असताना खोत यांनी ‘तू कोण सांगणार’, असे म्हणून गुरव यांच्या डोक्यात, हातावर लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले. जिवंत ठेवत नाही, असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच शोभा खोत यांनी गुरव यांना मारा, असे म्हटले. यावेळी गुरव यांच्या आईने सदाशिव यांच्या हातातील लोखंडी पाईप काढून घेण्याचा प्रयत्न केला असता सदाशिव यांनी त्यांच्या डोक्यावर पाईपने मारहाण करून जखमी केले.

तर दुसर्‍या घटनेत संशयित रमेश महादेव गुरव यांनी सदाशिव खोत यांना लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले. त्यांची पत्नी शोभा खोत यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. अशा परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही कुटुंबांतील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button