राहुरी : पैशांसह दागिन्यांसाठी विवाहित तरूणीचा छळ

राहुरी : पैशांसह दागिन्यांसाठी विवाहित तरूणीचा छळ

राहुरी : पुढारी वृत्तसेवा: 50 हजार रूपये रोख रक्कम व 2 तोळे सोन्याचे दागीने माहेरहून आणावेत. या कारणावरून 22 वर्षीय विवाहित तरूणीचा शारीरीक व मानसिक छळ करून तिला घरातून बाहेर काढून देण्यात आले. ही घटना राहुरी तालुक्यातील गोटूंबा आखाडा येथे घडली.

दिक्षा अजय साखरे (वय 22, रा. गोटूंबा आखाडा, हल्ली रा. बारागाव नांदूर) या विवाहित तरूणीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फेब्रुवारी 2020 ते 1 जून 2022 दरम्यान दिक्षा अजय साखरे ही गोटूंबा आखाडा येथील तिच्या सासरी नांदत असताना तिने माहेरहून 50 हजार रूपये रोख रक्कम व 2 तोळे सोन्याचे दागीने घेऊन यावेत. या कारणावरुन आरोपींनी तिला उपाशी पोटी ठेऊन तिचा शारीरिक व मानसीक छळ केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news