प्राथमिक शाळांमध्ये किलबिलाट सुरू; नगर तालुक्यात नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत | पुढारी

प्राथमिक शाळांमध्ये किलबिलाट सुरू; नगर तालुक्यात नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

वाळकी : गेल्या दोन वर्षांत कोरोना संक्रमण काळात प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयांत नवीन प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांंची स्वागताची संधी हुकल्यानंतर यंदाच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेत प्रवेश घेणार्‍या नवागत विद्यार्थ्यांचे नगर तालुक्यातील सर्व शाळा, विद्यालयामध्ये पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी आणि त्यांनी आनंदात शाळेत यावं यासाठी शासनाच्या धोरणानुसार पहिलं पाऊल या उपक्रमांतर्गत सर्वच शाळामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या आनंदोत्सवात विविध ठिकाणी शिक्षण क्षेत्रातील अधिकारी वर्गांनीही सहभाग नोंदविला. यानुसार तालुक्यातील प्रत्येक शाळेत इयत्ता पहिली व पाचवीच्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा मोठा परिणाम झाला होता. तिसर्‍या लाटेचा फारसा प्रभाव न जाणवल्यामुळे आगामी काळात शालेय शिक्षण पूर्ववत होईल, अशी आशा यावेळी व्यक्त केली जात आहे.

राहुरी :‘त्या’ केंद्राकडून ग्राहकांना लाखोंचा गंडा

विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती

दरम्यान, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागतामुळे नावागतांना आंनद गगनात मावेनासा झाला. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी लाक्षणीय होती. मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी बहुतांश शाळेत पालकांची हजेरी लाक्षणीय होती.

Back to top button