नगर : दुकानदार व मित्राला जबर मारहाण; सहा जणांविरोधात गुन्हे दाखल. | पुढारी

नगर : दुकानदार व मित्राला जबर मारहाण; सहा जणांविरोधात गुन्हे दाखल.

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : समृध्दी कॉम्प्लेक्स मधील युनिव्हर्सल स्पोर्टच्या दुकानांसमोरील कॉलमला दुकानाच्या जाहीरातीचे बॅनर दुकानदार व त्याचा मित्र चिटकावीत असताना सहा जणांच्या टोळक्याने येथे बॅनर लावायचे नाही, असे म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तोंडावर, पाठीवर छातीवर जिवे मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी सहा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

ब्रेकिंग! दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली, उद्या १ वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सुरज अशोक निमोणकर यांचे जामखेड पंचायत समिती समोर युनिव्हर्सल स्पोर्टचे दुकान आहे. या दुकानांसमोरील कॉलमवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास दुकान चालक सुरज निमोणकर व त्याचा मित्र विकास कचरू साळुंके हे स्पोर्टच्या जाहिरात चिटकावीत होता. सुरज हा कटर आणण्यासाठी दुसर्‍या दुकानात गेला असता त्यावेळेस कैलास विलास माने सर तेथे आला व त्याने कचरू साळुंके यास शिवीगाळ करून येथे बॅनर चिटकावयाचे नाही असे सांगितले.

पुणे : निरेत तब्बल ६६ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त

‘मी तीन वर्षे उगाच जेल भोगून आलो आहे का’, असे म्हणून कोणाला तरी फोन केला व थोड्याच वेळात एका मोटारसायकलवरून तुषार हनुमंत पवार, बबलु जाधव व राहूल माने (पूर्ण नाव माहीत नाही) व इतर दोन अनोळखी तिथे पायी चालत आले. तेव्हा माने सर यांनी ते दोघे आहेत त्यांना मारून टाका, जिवंत सोडू नका असे म्हणताच पाच जणांनी विकास व सुरज निमोणकरला तीन वेळा उचलून जमीनीवरील ब्लॉकवर आदळले व लाथाबुक्क्यांनी त्यांच्या तोंडावर पोटावर मारुन जखमी केले.

ऐकावं ते नवलच! चक्क उंदरांनी १० तोळे सोने पळवले, पोलिसांनी गटारातून केले जप्त

यावेळी कॉम्प्लेक्स मधील लोक सोडवण्यासाठी आले असता त्यांना शिवीगाळ करून हाकलून दिले. पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यास गोळ्या घालून ठार मारू, अशीधमकीदेऊन हे टोळके निघून गेले, अशी फिर्याद सुरज अशोक निमोणकर यांनी दिल्यावरून पोलीसांनी कैलास विलास माने, बबलू जाधव, तुषार हनुमंत पवार, राहुल मानेे व इतर दोन अनोळखी यांच्यावर भादवी कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button