नगर : भीमा पात्रात वाळूतस्करांवर मोठी कारवाई | पुढारी

नगर : भीमा पात्रात वाळूतस्करांवर मोठी कारवाई

काष्टी : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील पेडगावमध्ये (बहाद्दूरगड) भीमा नदीपात्रात दिवसा-ढवळ्या अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करांवर प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या आदेशाने श्रीगोंदा महसूल विभागाने मोठी करवाई करत 3 पोकलेन, 1 जेसीबी 1 ट्रक, 2 ट्रॅक्टर, 50 ते 60 ब्रास वाळू ताब्यात घेतली. कारवाई चालू असताना अनेक जेसीबी, ट्रॅक्टर व ट्रक पळून गेले.

शक्ती कपूरचा मुलगा ड्रग्ज प्रकरणी अटकेत, बंगळूर पाेलिसांची कारवाई

पेडगाव येथील बहादूरगडानजिक भवानीमाता मंदीराजवळ असलेल्या भीमानदी पात्रात गेली काही महिन्यापासून रात्रंदिवस राजरोस पणे पोकलेन, जेसीबी, ट्रक, ट्रॅक्टर, डंपरच्या सहाय्याने अनधिकृत वाळू, मुरुमाचे उत्खनन करून वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांना समजली. त्यांनी दि.12 रोजी सुट्टीचा वार पाहून दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास भर पावसात पेडगाव मंडलाधिकारी दिगंबर डहाळे, तलाठी एस. पी. बळी आणि चालक गाडीलकर यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार महसूल पथकाने भरपावसात 3 पोकलेन, 1 जेसीबी 1 ट्रक, 2 ट्रॅक्टर व 50 ते 60 ब्रास वाळू ताब्यात घेतली.

Amit Shah : त्र्यंबकेश्वरच्या समर्थ गुरुपीठात अमित शाह करणार योग दिवस साजरा

सरकारी गाडी पाहताच नदीपात्रातील अनेक जेसीबी, ट्रॅक्टर, ट्रक वाळू तस्करांनी पळवून नेले. या कारवाईमुळे वाळू तस्कराचे धाबे दणाणले आहेत. वाळू उपसा करणारे तालुक्यातील राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते असल्यामुळे महसूल विभागाने पकडलेली पोकलेन, जेसीबी, ट्रॅक्टर, ट्रक, अशी वाहने सोडविण्यासाठी अधिकार्‍यांवर दबावतंत्र चालू होते. परंतु स्वतः प्रांताधिकार्‍यांचा आदेश असल्याने कारवाई करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.

धक्कादायक ! पुण्यात महिलेचे अपहरण करून ट्रॅव्हल्स चालकाने केला बलात्कार

प्रांताधिकारी भोसले यांची दंबग कारवाई!

पेडगाव येथील भीमा नदीपात्रातून रात्रं-दिवस वाळू उपसा सुरू होता. याबाबत तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करूनही त्यांचे दुर्लक्ष होत होते. मात्र अचानक प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांना माहिती मिळताच त्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता दबंग कारवाई केल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

शिवसेना आमदार लताबाई सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र अवैधच; मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळली

वाळूतस्करांचा बंदोबस्त करणार : भोसले

प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी सांगितले की अवैध वाळू उपसा, तसेच वाहतुकीस माझा कायमच विरोध आहे. या अवैध व्यवसायाला मी तहसीलदार असल्यापासून विरोध करीत आलो आहे. माहिती मिळताच मी कारवाई करतो. पेडगाव येथील माहिती मिळताच श्रीगोंदा तहसीलदार मिलिंद कुलथे यांचा मोबाईल बंद असल्याने पेडगाव मंडलाधिकारी दिगंबर डहाळे यांना कारवाईचे आदेश दिले.

माहिती देणारा पोलिस कोण?

पेडगाव येथील भीमा नदीपात्रात वाळू तस्करांवर कारवाईसाठी मंडलाधिकारी दिगांबर डहाळे यांनी पोलिस बंदोबस्त मागितला. परंतु बंदोबस्त देण्याऐवजी नदीपात्रात महसूलचे पथक येणार असल्याची माहिती वाळू तस्करांपर्यंत पोहोचली. त्यामुळे संबंधित पोलिस कोण, याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Back to top button