

नगर, पुढारी वृत्तसेवा: चार्यांची दुरुस्ती करून शेतकर्यांना पाणी देण्यात यावे, या मागणीसाठी काल माजी जि. प. सदस्या हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखाली वाघोली येथील शेतकर्यांनी मुळाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना निवेदन देऊन लक्ष वेधले. शेवगाव तालुक्यातील बर्हाणपूर येथील पाथर्डी शाखेवरील उपवितरिका क्र. 2, 3 आणि 4 चार्या अत्यंत नादुरुस्त आहेत. शेवटच्या लाभधारक शेतकर्यांना पाणी मिळण्यासाठी चार्या देखील नाहीत, तरी त्या चार्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
वाघोली येथील डी-वाय चारीवरील उपचारी 1 आर ची दुरुस्ती करून मिरी रस्त्यावरील पुलाखाली भूमिगत पद्धतीने पाणी सोडावे, मिरी रस्त्यावर व निंबे रस्त्यावरील पुलाखाली भूमिगत पद्धतीने पाण्याची व्यवस्था न केल्याने या चारीवरील सर्वच लाभार्थी शेतकर्यांना शेतीला पाणी मिळत नसल्याने शेतातील हाती आलेल्या पिकांचे नुकसान होते, अशा अन्य मागण्यांसाठी हर्षदा काकडे यांच्या मार्गदर्शनात शेतकरी विष्णू वांढेकर, मोहन गवळी, भगवान शेळके, महादेव गवळी, अशोक दातीर, सुधाकर आल्हाट भारत भालेराव आदींनी मुळा पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांची भेट घेवून निवेदन दिले. यावेळी पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.