अर्ध्या एकरात टोमॅटोचे विक्रमी उत्पादन | पुढारी

अर्ध्या एकरात टोमॅटोचे विक्रमी उत्पादन

हातगाव : पुढारी वृत्तसेवा : येथील युवा शेतकरी नीलेश ढाकणे यांनी टोमॅटो पिकाच्या माध्यमातून अर्ध्या एकर क्षेत्रातून पाच लाखाचे उत्पादन मिळवला आहे. हातगाव परिसर ऊस शेतीसाठी प्रसिद्ध आहे; परंतु काही तरी वेगळे करायचे यातून ढाकणे यांनी फेब्रुवारी अखेर अर्धा एकर क्षेत्रावर टोमॅटो पिकाची लागवड केली.

लागवडीसाठी सिजेंटा 1057 या व्हरायटीची रोपे तयार केली. मल्चिंग व ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला. एप्रिल अखेर तोडणी सुरू केली. सुरुवातीला साडेतीनशे ते चारशे दर मिळाला, नंतर दर चढे राहिले आणि मे अखेरीस तो बारासे रुपये प्रति कॅरेटपर्यंत पोहोचल्यामुळे ढाकणे यांना भरघोस आर्थिक नफा मिळाला.

वाकड येथे पोलिसांनी सापळा रचून पकडला 24 किलो गांजा

सरासरी आठसे कॅरेट टोमॅटो व दरही सरासरी आठसेचा मिळाला त्यातून,त्यांना खर्च वजा जाता जवळपास पाच ते साडेपाच लाखाचा निव्वळ नफा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. प्लॉट आजही सुरू असून, आणखी शंभर कॅरेट टोमॅटो निघेल, असा त्यांचा अंदाज आहे. या पिकाच्या लागवडीपासून तोडणीपर्यंत अ‍ॅग्री डॉक्टर संदीप खाडे यांचे मार्गदर्शन लाभले. नीलेश ढाकणे यांना पत्नी चंदा यांची खंबीर साथ मिळाली. पारंपरिक पीक पध्दतीत बदल करून बाजार पेठेचा अंदाज घेऊन पीक घेतल्यास शेती नक्कीच फायदेशीर ठरते, असे नीलेश ढाकणे यांनी सिद्ध करून दाखविले.

उष्ण हवामानातील टोमॅटोचे पीक
टोमॅटो पीक उष्ण हवामानातील असले, तरीही महाराष्ट्रात टोमॅटोची लागवड वर्षभर केली जाते. टोमॅटो पिकास स्वच्छ, कोरडे, कमी आर्द्रता असलेले व उष्ण हवामान चांगले असते. उष्ण तापमान व भरपूर सूर्यप्रकाश असल्यास टोमॅटो फळांची गुणवत्ता चांगली असते. फळांचा रंगही आकर्षक येतो.

Back to top button