मित्रांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या | पुढारी

मित्रांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

नगर : मित्रांनीच व्यवहारात फसविले आणि कामाचे पैसे मागितल्यानंतर त्यांच्याकडून होणार्‍या दमदाटीला कंटाळून त्यांनी एकाने आत्महत्या केली. ही घटना केडगाव येथे घडली.

याबाबत मंगळवारी कोतवाली पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. परमेश्वर मारुती विधाते उर्फ मामा, सुनील रामदास घेंबूड आणि अनिल बाबा लोंढे (सर्व रा. केडगाव, अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत. राजेंद्र दामोदर सोनवणे (रा. केडगाव, अहमदनगर) असे मयताचे नाव आहे. .

याबाबत मयताची पत्नी कौशल्या सोनवणे यांनी फिर्यादीत म्हटले, मयत राजेंद्र सोनवणे केडगाव परिसरात वास्तव्यास होते. आरोपी विधाते, घेंबूड आणि लोंढे यांच्याकडून सोनवणे यांना काम मिळत असे. त्या कामाचे पैसे देत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आरोपी सोनवणे यांना कमी पैसे देत होते, तसेच पैशांची मागणी केल्यानंतर दमदाटी करत होते. या नैराशातून सोनवणे यांनी 1 जूनच्या रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.

Back to top button