

नेवासा :पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील कुकाणा परिसरातील देवसडे येथील रहिवासी व ठाणे येथेे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच े एस पी डॉ. पंजाबराव उगले यांना डीआयजीपदी पदोन्नती मिळाली. त्यांची बदली ठाणे पश्चिम प्रादेशिक विभागाच्या पोलिस आयुक्तपदी झाली.
नाशिक, जळगाव व ठाणे येथे उगले यांनी पोलिस अधीक्षकपदी चमकदार कामगिरी केली. एक कर्तव्यतत्पर आयपी एस अधिकारी म्हणून ते पोलिस खात्यात परिचित आहेत. नाशिक व ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एस. पी. म्हणूनही उगले यांची कारकीर्द उल्लेखनीय व पोलिस यंत्रणेची शान वाढविणारी ठरली.
बुधवारी सुधारित पदस्थापनेत उगले यांना पोलिस अधीक्षक पदावरून पोलिस उपमहानिरीक्षक दर्जाच्या पदावर पदोन्नती देण्यात आली. उगले यांच्यासह राजेंद्र माने व दत्तात्रय शिंदे या एसपींनाही पोलिस उपमहानिरीक्षकपदी सरकारने पदोन्नती दिलीे. मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे, भाजप नेते सचिन देसरडा व विठ्ठलराव लंघे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हरिभाऊ शेळके यांनी त्यांचे अभिनंदन केले.