‘त्या’ कुटूंबांचा घरकुलांचा प्रश्न लागणार मार्गी; जागा नसलेल्या लाभार्थ्यांसाठी भूमिशोध अभियान | पुढारी

‘त्या’ कुटूंबांचा घरकुलांचा प्रश्न लागणार मार्गी; जागा नसलेल्या लाभार्थ्यांसाठी भूमिशोध अभियान

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील ब यादीतील 5 हजार 601 व ड यादीतील 4 हजार 216 लाभार्थीना घरकुल बांधकामासाठी स्वःमालकीची जागा नसल्याने, या लाभार्थीना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले आणि सीईओ आशिष येरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पारनेर तालुक्यातील हंगा येथे भूमिशोध अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

जिल्हाधिकारी भोसले व सीईओ येरेकर यांनी हंगा गावातील शासनाच्या जागेची पाहणी करून आवास प्लस यादीतील हंगा गावातील 13 भूमिहिन लाभार्थीना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी त्याच ठिकाणी जागेची पडताळणी केली. भूमिहिन लाभार्थ्यांसाठी हीच जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांना दिले.

पंचविशीतच बनला अब्जाधीश उद्योजक!

यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील पठारे, पारनेरचे गटविकास अधिकारी माने, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते. हे अभियान 10 ते 25 जून 2022 या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. जिल्हयातील सामाजिक व आर्थिक जातनिहाय सर्वेक्षण ब यादीतील एकूण 47 हजार 658 लाभार्थी पात्र असून, यापैकी 41 हजार 985 लाभार्थीच्या प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.

अद्यापि 5 हजार 673 लाभार्थीना घरकुल बांधकामासाठी मंजुरी देणे प्रलंबित आहे. 5 हजार 673 लाभार्थीपैकी 5 हजार 601 लाभार्थीना घरकुल बांधकामासाठी स्वमालकीची जागा उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे आवास प्लसच्या ड यादीत एकूण 4 हजार 216 लाभार्थीना जागा उपलब्ध नसल्याने मंजुरी देता आली नाही. भूमिहीन लाभार्थीना सदरील जागेवरील लाभार्थींचे अतिक्रमण नियमाकुल करुन 25 जून 2022 पर्यंत जागा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही भूमिशोध अभियानामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान, या निर्णयामुळे अनेकांची घराची स्वप्ने साकार होणार आहेत.

Back to top button