खेड गावावर ‘तिसर्‍या डोळ्याची’ नजर, चार सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित | पुढारी

खेड गावावर 'तिसर्‍या डोळ्याची' नजर, चार सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

खेड : पुढारी वृत्तसेवा

नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांच्या हद्दीवरील व कर्जत-बारामती राज्यमार्गावरील खेड ग्रामपंचायतीने आता आदर्श गावाकडे वाटचाल सुरू ठेवली आहे.पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामपंचायतीने गावातील मुख्य बसस्थानक चौकात चार सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले आहेत. उद्योजक नीलेश निकम यांनीही स्वखर्चाने ग्रामपंचायत परिसरात अत्याधुनिक सोलर सिस्टीमची सीसीटीव्ही यंत्रणा बसवून दिली आहे.

या सीसीटीव्ही यंत्रणेचा लोकार्पण सोहळा नुकताच पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते पार पडला. कर्जत-बारामती राज्यमार्ग अनेक जिल्ह्यांना जोडला जात असल्याने या ठिकाणावरून जाणारा प्रत्येकच सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद होणार आहे. याचा फायदा गावची गुन्हेगारी रोखण्यासाठी होणारआहे. मात्र, राज्यमार्गावर होणार्‍या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी याचा फायदा होईल.

Ambani-Adani : अंबानी-अदानींना धक्का, 100 अब्ज डॉलर क्लबमधून बाहेर!

यावेळी यादव म्हणाले की, गावांचे संरक्षण होण्यासाठी तालुक्यातील अनेक गावांना सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक गावांनी ही यंत्रणा राबवली.आत्तापर्यंत अनेक गंभीर गुन्हे सीसीटीव्हीमुळे उघड करणे शक्य झाले.लोकसहभागामुळेच ग्रामसुरक्षा यंत्रणेसारखे प्रभावी उपक्रम राबवता आले.

लोकार्पण सोहळ्यास सरपंच अमृता वाघमारे, उपसरपंच सचिन मोरे, माजी पं.स. सदस्य अण्णासाहेब मोरे, बाळासाहेब मोरे,धनंजय खंडागळे,अण्णासाहेब शेटे, माजी उपसरपंच अमित मोरे, अमिन शेख,लक्ष्मण कांबळे,शंकरराव मोरे, ग्रामविकास अधिकारी नांगरे, तंटामुक्तीचे राजेंद्र चव्हाण, सोमनाथ वाघमारे उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार सोमनाथ वाघमारे यांनी मानले.

त्यांचाही यादव यांनी सन्मान!
उद्योजक नीलेश निकम यांनी स्वखर्चातून ग्रामपंचायत परिसरात अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा बसवून दिली आहे. ही यंत्रणा सौरऊर्जेवर चालणारी आहे. समाजहितासाठी पुढाकार घेऊन मदत केल्याने यादव यांनी त्यांचे कौतुक करीत सन्मान केला.

 

Back to top button