गावठी कट्टाप्रकरणी एकजण गजाआड | पुढारी

गावठी कट्टाप्रकरणी एकजण गजाआड

नगर : पुढारी वृत्तसेवा

गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुस बाळगणार्‍या सोन्या उर्फ संतोष पांडुरंग बंगाळ (वय 29, रा. रोटेगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रवरा संगम येथून पकडले.

बंगाळ हा गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने प्रवरा संगम येथे सापळा लावून सोन्या उर्फ संतोष पाडुरंग बंगाळ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिस नाईक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे, पोहेकॉ दत्तात्रेय गव्हाणे, मनोज गोसावी, पोना ज्ञानेश्वर शिंदे, पोना शंकर चौधरी, पोना दीपक शिंदे, पोकॉ शिवाजी ढाकणे, संभाजी कोतकर यांच्या पथकाने केली.

Back to top button