आगामी जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचाच : मंत्री तनपुरे | पुढारी

आगामी जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचाच : मंत्री तनपुरे

वळण : पुढारी वृत्तसेवा

मतदार संघ काहीही असो, पण 32 गावेही आपल्याच राहुरी तालुक्यातील आहेत. येथील ग्रामस्थांना भेडसावणारे प्रश्न समजून घेऊन सोडविण्यासाठीच मी प्राधान्याने आढावा बैठक घेत आहे. सार्वजनिक प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील, असे आश्वासन ऊर्जा तथा आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले. दरम्यान, आगामी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार, असा विश्वास मंत्री तनपुरे यांनी व्यक्त केला.

सोलापूर : भावकी वादातून अंगावर उकळलेले तेल टाकले

मंत्री तनपुरे यांनी राहुरी तालुक्यात जी 32 गावे श्रीरामपूर विधानसभेला जोडलेली आहेत, त्या गावच्या आढावा बैठका घेतल्या. यावेळी ते माडुकसेंटर व लाख येथील बैठकीत बोलत होते. मंत्री तनपुरे यांनी प्रथम त्यांनी 32 गावातील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. महाडूक सेंटर, लाख, करजगाव, बोधेगाव व केसापूर या ठिकाणी आढावा बैठक घेतल्या. यावेळी त्यांच्या समवेत शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त व प्रेरणा पतसंस्थेचे चेअरमन सुरेश वाबळे, जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस व टाकळीमिया गणातील ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश निमसे, पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ, दत्तात्रेय कवाने, शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे, प्रकाश देठे आदी उपस्थित होते.

उजनी पाईपलाईनच्या कामाची निविदा पुन्हा मागविणार

यावेळी अनेक शेतकर्‍यांनी शेती करता वीज दिवसा व पुरेशी द्यावी, रस्त्याची दुरुस्ती करावी, मुसळवाडी व इतर नऊ गावांना शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत करावा, कान्हेगाव व लाख येथील पुलाचे काम करावे , वांजुळपोई सब स्टेशनचे काम करून, वीज पुरवठा सुरू करावा आदी मागण्या केल्या. दरम्यान, या प्रश्नांबाबत मंत्री तनपुरे म्हणाले, ऊर्जा खात्याच्या माध्यमातून विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी जेथे- जेथे आवश्यकता आहे तेथे आपण ट्रान्सफार्मर दिले. दीड ते दोन महिन्यातच वांजुळपोई सब स्टेशनचे काम प्रत्यक्षात सुरू होईल. लाख पुलासाठी निधी उपलब्ध करून देऊ, मुसळवाडी तलावातील जलपर्णी काढण्यासाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून तातडीने प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.

या आढावा बैठकीत डॉ. सोळुंके, विक्रम धुमाळ, आप्पासाहेब जाधव, रखमाजी जाधव, अशोक विटनोर, सुभाष सजगुरे, अशोक गल्हे, पंकज आढाव, बबन बोरुडे, ज्ञानेश्वर पवार, दत्तात्रेय शेळके, संदीप गल्हे, दादासाहेब खाडे, रणजीत गायकवाड, भास्कर खाडे ,नुरा सय्यद, लक्ष्मण खाडे, शौकत सय्यद, वेणुनाथ कोतकर, रामा कोतकर, अ‍ॅड. पुजाताई लावरे, दत्तात्रय खर्डे, बाबासाहेब भांड, बाबासाहेब पवार, सुरेश करपे, गिरीश निमसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

सत्ता नसल्याने भाजपा कासावीस..!

विरोधक दोन धर्मात भांडणे लावायची काम करीत आहेत. कुठे हनुमान चालीसा वाचावी, याने समाजाचे प्रश्न सुटणार आहेत का, त्यांना तुमचे काही घेणे- देणे नाही. आम्हालाही कामे करू दिली जात नाही. ईडी, सीबीआय सारख्या संस्थांच्या चौकशी लावून ते सत्ता मिळवू पाहत आहेत. सत्ता नसल्याने भाजपा कासावीस झाल्याचे टीकास्त्र मंत्री तनपुरे यांनी सोडले.

 

Back to top button