चौंडीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही : पर्यटन राज्य मंत्री अदिती तटकरे  | पुढारी

चौंडीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही : पर्यटन राज्य मंत्री अदिती तटकरे 

जामखेड : पुढारी वृत्तसेवा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी येथील विविध विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही पर्यटन राज्य मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. मंत्री तटकरे यांनी चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाशेजारील सीना नदी काठावर 4 कोटी 20 लाख रुपये खर्चून घाटाची उभारणी होणार आहे.

हॉटेलचे बिल बुडविणार्‍या ग्राहकाला अटक

या कामाचे भूमिपूजन पर्यटन राज्यमंत्री तटकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार रोहित पवार, आमदार यशवंत माने, आमदार राजू नवघरे उपस्थित होते. मंत्री तटकरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास अभिवादन करून अहिल्यादेवी होळकर शिल्पसृष्टीची पाहणी केली. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर स्मारकाशेजारी असलेल्या सीना नदीची पाहणी केली.

सिंधुदुर्ग : पावसाच्या तोंडावर आंबोली घाटातील दरडींचे ड्रिल!

तसेच चौंडीच्या विकास कामासाठी पर्यटन विभागाचा निधी कमी पडू देणार नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. कार्यक्रमास माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, मधुकर राळेभात, चौंडीच्या सरपंच आशाताई उबाळे, वैजनाथ पोले, सुंदरदास बिरंगळ, कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, सहायक अभियंता अमित निमकर, संजय कांबळे, विश्वनाथ राऊत, संतोष निगुडे, तहसीलदार योगेश चंद्रे, तहसीलदार नानासाहेब आगळे, अमर चाऊस, शरद ढवळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Back to top button