विधानसभेसाठी राहुल जगतापांच्या पाठीशी : बाबासाहेब भोस | पुढारी

विधानसभेसाठी राहुल जगतापांच्या पाठीशी : बाबासाहेब भोस

कोळगाव : पुढारी वृत्तसेवा

सार्वजनिक जीवनात अनेक पदे भूषविली. राजकारणात पेरीत राहिलो, जीवाभावाचे माणसे तयार होत गेली. सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविल्या, आता कसलीही अपेक्षा नाही. मला आमदार -खासदार व्हायचे नसून, मी राहुल जगताप यांच्या पाठीशी विधानसभा निवडणुकीत असणार आहे, अशी ग्वाही जिल्हा परिषद माजी अध्यक्ष, श्रीगोंदा कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस दिली. विसापूर ग्रामस्थांनी त्यांचा 71वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते.

कुकडी कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप अध्यक्षस्थानी होते. अभिष्टचिंतन मेळाव्यात भोस म्हणाले, राजकारणामुळे कुटुंबाकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही ही खंत वाटते. आता, वय झाले, येथून पुढे कसलेही पद नको. यापुढील काळात आहे, त्यापदांचा उपयोग करून जनसामान्यांची कामे करत राहणार आहे.

शाळा सुरू होणार; पण लसीचे काय?

रयत शिक्षण संस्थेमध्ये स्व. शंकरराव काळे यांनी खूप आधार दिला. विसापूर शाखेलाही लवकरच भरघोस निधी उपलब्ध करून देणार असून, विसापूर शाळेची इमारत सुसज्ज व अद्ययावत करणार आहे. मी स्वतःची शिक्षण संस्था किंवा अन्य संस्था काढू शकत होतो; परंतु वडिलांनी रयत शिक्षण संस्थेच्या शाळांकडे लक्ष द्यावयास सांगितल्याने रयतमध्ये सर्वस्व झोकून देऊन काम केले. रयत सेवकांचे व विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यात आले. त्यामुळे मी समाधानी आहे.

यावेळी चिखली सोसायटीचे अध्यक्ष रामदास झेंडे, जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव पंदरकर, भाजपचे संतोष लगड, भीमराव शिंदे, कुकडी कारखान्याचे संचालक भाऊसाहेब इथापे, संजय लाकूडतोडे आदींची भाषणे झाली. या अभिष्टचिंतन सोहळ्यात भोस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

पुणे : सराईत चोरट्याकडून पावणेदोन लाखाची वाहने जप्त

केक कापून वाढदिवस केला. विविध शाखांचे प्रतिनिधी, सेवक, ग्रामस्थ, विविध संस्था यांनी भोस यांचा सत्कार केला. यावेळी खंडेराव नाईक, बापूराव ढगे, विशाल धुमाळ, गुलाबराव रामफळे, मोहनराव चंदन, बाजीराव कोरडे, श्रीधर लांडगे, बाळासाहेब चितळे, अ‍ॅड. लांडगे, विष्णू जठार, जब्बार सय्यद, सूर्यभान लाकुडझोडे, जी. एस. गावडे, विनायक आढाव, फक्कडराव जाधव, सतीश काळे, महादेव नरवडे, सुनील जठार, सोपानराव आढाव, संभाजी शिर्के उपस्थित होते.

‘भोस यांच्यासाठी थांबण्यास तयार’

राहुल जगताप म्हणाले, बाबासाहेब भोस यांच्यामुळे स्व. कुंडलिकराव तात्यांची उणीव भरून निघाली. भोस यांनी अनेकवेळा मार्गदर्शन केले. भोस यांनी जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्याचा कानमंत्र दिल्यानेच संचालक झालो. मागील विधानसभेच्या निवडणुकीवेळी कुकडी कारखाना अडचणीत असल्यामुळे दोन पावले मागे घेतली. आताही ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस विधानसभा लढविण्यास तयार असतील तर, मी पुन्हा एकदा थांबण्यास तयार आहे.

Back to top button