पुणे : सराईत चोरट्याकडून पावणेदोन लाखाची वाहने जप्त | पुढारी

पुणे : सराईत चोरट्याकडून पावणेदोन लाखाची वाहने जप्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा

एका सराईत चोरट्याला पकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी पावणेदोन लाखाची चोरीची चार वाहने जप्त केली आहेत. त्यामध्ये एक रिक्षा व तीन दुचाकींचा समावेश आहे. सचिन सुरेश चिंतामणी (वय.37,रा.सच्चाई माता जैनमंदीर जवळ कात्रज) असे त्याचे नाव आहे.

महाड : पतीच्या त्रासाला कंटाळून तिने घेतला ६ मुलांचा जीव; पतीविरूद्ध गुन्हा दाखल

पोलिस कर्मचारी अभिजित जाधव व विक्रम सावंत यांना बातमी मिळाली होती की सराईत वाहन चोरटा चिंतामणी हा जैन मंदीर कात्रज परिसरात एका पांढर्‍या रंगाच्या दुचाकीवरून फिरत आहे. त्यानुसार उपनिरीक्षक धिरज गुप्ता व नितीन शिंदे याच्या पथकाने सापळा रचून चिंतामणी याला ताब्यात घेतले.

Sakinaka Rape Case : बलात्कारानंतर गुप्तांगात रॉड घुसवून केला होता खून; नराधम चौहान अखेर फासावर

त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने ती दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. तपासादरम्यान त्याच्याकडून इतर वाहने जप्त करण्यात आली आहेत. ती त्याने शहरातील विविध भागातून चोरी केल्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, गुन्हे निरीक्षक संगिता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, तुळशीराम टेंभुर्णे, सचिन गाडे यांच्या पथकाने केली.

Back to top button