राहुरीतील वाढती गुन्हेगारी थांबता थांबेना! शहरात चोरट्यांचा सुळसुळाट | पुढारी

राहुरीतील वाढती गुन्हेगारी थांबता थांबेना! शहरात चोरट्यांचा सुळसुळाट

राहुरी : पुढारी वृत्तसेवा

राहुरी शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. एकीकडे कात्रडमध्ये मारहाण, तर दुसरीकडे तरुणाकडून महिलेचा विनयभंग झाल्याच्या घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे राहुरी शहरातील वाढती गुन्हेगारी थांबत नसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

राहुरी शहर हद्दीत अज्ञात भामट्यांनी 28 मे रोजी रात्रीच्या दरम्यान, तीन ठिकाणी धाडसी चोर्‍या केल्याचे उघड झाले आहे. तसेच एक सोन्याचे दुकान फोडून चोरट्यांनी लाखो रुपये किमतीचा चांदीचा माल व काही रोख रक्कम चोरून नेल्याचे सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे.

भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच होणार

मधुकर बाळकृष्ण उदावंत (वय 52, रा. ताहाराबाद, हल्ली राहणार भुजाडी इस्टेट, ता. राहुरी) यांचे राहुरी शहर हद्दीतील मल्हारवाडी रोड परिसरात गणेश अलंकार नावाचे सराफ दुकान आहे. सराफ व्यवसाय करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. 28 मे रोजी मधुकर उदावंत हे नेहमीप्रमाणे रात्री आठ वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. दुसर्‍या दिवशी सकाळी दुकानाचे शटर कोणीतरी उचकटून वर केल्याचे त्यांना समजले. त्यांनी दुकान उघडून पाहिले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत राहुरी पोलिसांत खबर दिली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

या घटनेत तीन अज्ञात चोरट्यांनी मधुकर उदावंत यांच्या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानाची उचकापाचक करून सुमारे 1 लाख 47 हजार 300 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. तसेच अनिकेत विठ्ठल भुजाडी यांच्या किराणा दुकानात, तर नकुल अर्जुन गाडे यांच्या सत्यविश्व मेडिकल व जनरल स्टोअर्समधून पशुवैद्यकीय औषधांची मेडिकलमध्ये चोरी झाली. या घटनेबाबत मधुकर बाळकृष्ण उदावंत यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत अज्ञात तीन चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Nashik : महिला कॉन्स्टेबलचे धैर्य, हातात चाकू असताना खून्याला पकडले

घरात घुसून महिलेचा विनयभंग

स्वयंपाक करत असलेल्या 30 वर्षीय विवाहित महिलेच्या घरात एक तरुण घुसून विनयभंग केल्याची घटना 30 मे रोजी घडली. याबाबत तरुणावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अभिजीत लक्ष्मण मकासरे (रा. वळण, ता. राहुरी) असे त्याचे नाव आहे. सदरील तरुण एका तीस वर्षीय विवाहित महिलेच्या घरात घुसला. त्यावेळी महिला स्वयंपाक करत होती. यावेळी मकासरे याने तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. घटनेनंतर सदर महिलेने राहुरी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. विवाहित महिलेच्या फिर्यादीवरून अभिजित लक्ष्मण मकासरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Rinkoo Rahee : माफियांनी ७ गोळ्या झाडल्या, तरीही हारली नाही हिंमत, रिंकू राही यांनी क्रॅक केली UPSC परीक्षा

गेल्या काही महिन्यांपासून राहुरी शहर, तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. पोलिस निरीक्षक दराडे यांनी आपल्या कारभाराची सुत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात सुरुवात केलेली आहे. परंतु राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना मोठे कष्ट करावे लागणार आहे. त्यासाठी वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.

Back to top button