भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच होणार | पुढारी

भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच होणार

पुणे :

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील येणार्‍या प्रभागांमधील जवळपास सर्वच प्रभागांमध्ये आरक्षण सोडतीनंतर भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच रंगणार असल्याचे चित्र आहे. तर महिला आरक्षणाची समीकरणामुळे काही प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांचीही समीकरणे जुळू शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीचे समन्स

शिवाजीनगर मतदारसंघात प्रभाग क्र. 10 शिवाजीनगर गावठाण- संगमवाडी या प्रभागात अनुसुचित जाती, महिला आणि सर्वसाधारण अशी आरक्षणे पडली आहेत. यामधील सर्वसाधारण जागेसाठी राष्ट्रवादीचे बाळासाहेब बोडके, सेनेचे राजु पवार या माजी नगरसेवकांना आमने-सामने यावे लागेल.

मात्र, सेना आणि राष्ट्रवादी आघाडी झाल्यास ही जागा नक्की कोणाला असा प्रश्न निर्माण होईल. अनुसुचित जाती प्रभागात माजी नगरसेविका स्वाती लोखंडे, सोनाली लांडगे, आशा साने, राजु साने यांचा मार्ग मोकळा झाला आहे. तर सर्वसाधारण जागेवरून आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांना पुन्हा संधी मिळणार आहे.

WhatsApp चे नवीन फीचर येतेय, sent झालेला मेसेज एडिट करता येणार!

प्रभाग क्र. 11 बोपोडी- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या प्रभागात अनुसुचित जातीमुळे माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, परशुराम वाडेकर, सुनिल माने, अर्चना कांबळे तर सर्वसाधारण एक जागेसाठी बंडू ढोरे, श्रीकांत पाटील, आनंद छाजेड, करिम शेख यांच्यात स्पर्धा होणार आहे. या प्रभागात महिला आरक्षित जागेवर आनंद छाजेड यांच्या पत्नीला संधी मिळाल्यास भाजपचा उमेदवारीचा पेच
सुटणार आहे.

प्रभाग क्र. 12 औंध-बालेवाडीचा काही भाग शिवाजीनगर तर काही भाग कोथरूड मतदारसंघात मोडतो. या प्रभागात एकच सर्वसाधारण जागेवर भाजपकडून सनी निम्हण, दत्ता गायकवाड, काँग्रेसचे कैलास गायकवाड हे दावेदार असणार आहे. अनुसुचित जातीच्या एका जागेवर भाजपचे सुनिल माने यांनाही संधी मिळू शकेल. तर एका महिला जागेसाठी मात्र अर्चना मुसळे, स्वप्नाली सायकर, संगिता गायकवाड आणि अमोल बालवडकर यांच्या मातोश्री आशाताई बालवडकर, मयुरी प्रणव बालवडकर अशी इच्छुकांची मोठी संख्या आहे.

कर्ज बुडवल्याप्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल

प्रभाग क्र. 15 गोखलेनगर-वडारवाडी या प्रभागात सर्वसाधारण दोन जागा खुल्या असल्याने काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट आणि राष्ट्रवादीचे निलेश निकम हे आमने-सामने येणार नसल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय मुकारी आलगुडे, विनोद ओरसे याही इच्छ्कांचा समावेश आहे.

प्रभाग क्र. 16 फर्गुसन कॉलेज-एरंडवणे या प्रभागात सर्वसाधारण दोन जागा आणि एक महिला आल्याने भाजपची डोकेदुखी काहीशी कमी झाली आहे. या प्रभागात माजी नगरसेविका निलीमा खाडे, माधुरी सहस्त्रबुध्दे, जोत्स्ना एकबोटे, मंजुश्री खर्डेकर या महिला तर दिपक पोटे, पुनीत जोशी अशी इच्छुकांची नावे आहे. त्यामुळे सर्वसाधारण जागेवर भाजपला महिलेला संधी द्यावी लागण्याची शक्तता आहे.

Back to top button