अनुराधा पौडवाल यांची कोपरगाव बेट भागातील गुरु शुक्राचार्य महाराजांच्या मंदिरास भेट | पुढारी

अनुराधा पौडवाल यांची कोपरगाव बेट भागातील गुरु शुक्राचार्य महाराजांच्या मंदिरास भेट

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी ३० मे रोजी कोपरगाव बेट भागातील गुरु शुक्राचार्य महाराजांच्या मंदिरास भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले. ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत पूजा केली. मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले.

खासगी पूजा करण्यासाठी आल्याचे श्रीमती अनुराधा पौडवाल यांनी यावेळीसांगितले. त्यांनी नवग्रह व शुक्र शांती पूजा पाठ केला. त्याचे पौरोहित्य कोपरगाव येथील वेदमूर्ती सागर, संदेश खुळगे, संजय जोशी यांनी केले. मंदिराचे पुजारी नरेंद्र जोशी यांनी त्यांचे स्वागत केले, यावेळी सचिन परदेशी,प्रसाद पावरा, प्रसाद पर्हे आदी उपस्थित होते. मंदिर परिसरात चाहत्यांनीही गर्दी केली होती.

गडचिरोली : वनविभाग नव्हे, आम्हीच देणार तेंदू वाहतुकीचा परवाना ; ४० ग्रामसभांचा निर्धार

अनुराधा पौडवाल यांनी मराठीसह हिंदी, तमिळ, उडिया, नेपाळी अश्या विविध भाषांतील चित्रपटांतूनही पार्श्वगायन केले आहे. इ.स. १९७३ सालच्या ‘अभिमान’ या हिंदी चित्रपटातील संस्कृत श्लोकाच्या गायनातून त्यांनी पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण केले होते.

वादळी पावसामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी रद्द; इंटरनेट सेवा ठप्प

गुरु शुक्राचार्य यांची महती विविध देशात भक्तांना कळावी म्हणून देवस्थान प्रयत्नशील आहे, गुरु शुक्राचार्यांवर आधारित मराठी व हिंदी भाषेतील विविध मंत्र, संजीवनी मंत्र, भजन गाणी त्यांनी म्हणावीत म्हणून अनुराधा पौडवाल यांना आपण पत्र पाठवून साकडे घालणार असल्याचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी सांगितले.

Back to top button