नगर : पथदिव्यांमधून होतेय वीजचोरी; महिन्याला 38 लाखांचे बिल | पुढारी

नगर : पथदिव्यांमधून होतेय वीजचोरी; महिन्याला 38 लाखांचे बिल

नगर : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेने शहरात स्मार्ट एलईडी दिवे लावले आहेत. पथदिव्यांसाठी मनपाचे 250 वीज कनेक्शन आहेत. त्या कनेक्शनमधून वीज चोरी होत असल्याचे समोर आले आहे. एलईडी दिवे लावल्यानंतर वीजबिल कमी होण्याऐजवी महिन्याला 38 लाख रुपये पथदिव्यांचे वीजबिल येत आहे. त्यामुळे एलईडी ठेकेदारांची डोकेदुखी वाढल्याचे बोलले जाते.

महापालिकेने स्मार्ट एलईडी लावण्याचा ठेका संबंधित एका कंपनीला दिला आहे. त्या कंपनीत आतापर्यंत शहरात 32 हजार पथदिवे लावले असून, अजून चार हजार पथदिव्यांची मागणी आहे. आता पथदिव्यांच्या वीज आकारातून त्याच संबंधित ठेकेदाराचे बिले दिले जाणार आहे. त्यामुळे पथदिव्यांच्या वीजबिलाचा प्रश्न मनपाकडे येत नाही.

परंतु, स्मार्टएलडी लावूनही वीजबिल कमी होत नसल्याचे संबंधित ठेकेदार कशाला ठेका चालवील, अशी अवस्था झाली आहे. कारण संपूर्ण नगर शहरात मनपाचे पथदिव्यांसाठी 250 वीज कनेक्शन आहेत. या कनेक्शनमधून रात्रीच्या वेळी वीज चोरी होत असल्याच्या अनेक तक्रारी विद्युत विभाग व महापालिका आयुक्तांकडे आल्या आहेत. महापालिकेला दर महिन्याला पथदिव्यांसाठी 38 हजार वीज बिल येत आहेत.

मनपावरील आर्थिक भार कमी करण्यासाठी एलईडी दिवे बसविण्यात आले. मात्र, एलईडी दिवे बसूनही पथदिव्याचे बिल कमी होत नाही. नेमके बिल कशामुळे येत याची मनपाने चौकशी सुरू केेली आहे. त्यामुळे पथदिव्यांसाठी घेतलेल्या कनेक्शनला नवीन मीटर बसविण्यात येणार आहे. त्यानंतर पथदिव्यांच्या कनेक्शनमधून होणारी वीज चोरी थांबू शकते, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

पथदिव्यांच्या वीज कनेक्शनमधून काही ठिकाणी वीज चोरी होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. अजून त्याची तपासणी सुरू आहे. त्यामुळे महावितरणकडून सर्व मीटर बदलून घेतले जाणार आहेत.

-शंकर गोरे, आयुक्त, महापालिका.

 

Back to top button