दोन वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रतीक्षा संपणार; प्रत्येक जिल्ह्याला मिळणार स्वतंत्र सॉफ्टवेअर | पुढारी

दोन वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रतीक्षा संपणार; प्रत्येक जिल्ह्याला मिळणार स्वतंत्र सॉफ्टवेअर

नगर : पुढारी वृत्तसेवा

दोन वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या बदल्यांसाठी आता शासनस्तरावरून हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे. आठवडाभरात शिक्षक बदल्यांसाठी तयार केलेल्या पोर्टलची चाचणी होणार असून, त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील तीन/चार कर्मचार्‍यांना पुण्यात प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र पोर्टल देण्याचेही नियोजन सुरू असल्याचे सूत्रांकडून समजले.

जिल्ह्यात 11 हजार शिक्षक आहेत. या शिक्षकांची सर्व माहिती शिक्षण विभागाने यापूर्वीच ग्रामविकास विभागाकडे पाठविलेली आहे. त्यातून बदलीस पात्र ठरणार्‍या शिक्षकांची यादी तयार केली जाणार आहे. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तयार केलेल्या पोर्टलव्दारे (अ‍ॅप) बदली प्रक्रिया होणार आहे. मात्र, 31 मे ही बदल्यांची अंतिम मुदत असतानाही संबंधित पोर्टल कार्यान्वित झालेले नाही. त्यामुळे शिक्षकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. याप्रश्नी अनेक शिक्षक संघटनानी शासनस्तरावर पाठपुरावा केला.

गुंजाळे घाटात सापडला मानवी हाडांचा सांगाडा, घातपात की जादूटोणा याबाबत चर्चा

अखेर, शासनाने याबाबत निर्णय घेताना शिक्षक बदली प्रक्रिया वेगाने आणि पारदर्शी करण्यासाठी लवकरच संबंधित अ‍ॅप कार्यान्वित करण्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भात नुकत्याच पुण्यात झालेल्या एका बैठकीत दोन-तीन दिवसात पोर्टलची चाचणी करण्यात येणार आहे. तसेच जुनमध्ये बदल्या सुरू होतील, या नियोजनावरही चर्चा झाल्याचे समजते.

आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत बदल्या

या अ‍ॅपच्या माध्यमातून आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत बदल्या केल्या जाणार आहेत. संबंधित सॉफ्टवेअर मराठी आणि इंग्रजी भाषेत आहे. हे संगणकासह मोबाईलवरही वापरात येणारे आहे. माहिती अपडेशन करणे, आंतरजिल्हा बदली आणि जिल्ह्यांतर्गत बदली अशा तीन टप्प्यांत बदलीचे नियोजन असेल. त्यात अवघड शाळा, दुर्गम शाळा, पती-पत्नी एकत्रीकरण, अंतर इत्यादी तपासून बदल्यांसाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

धोकादायक इमारती पाडण्यास मुहूर्त! पंधरा दिवसांत कारवाईला सुरूवात; घरमालकांना नोटिसा

शिक्षक बदलीचे पोर्टल लवकरच सुरू होईल. जिल्ह्यातून तीन ते चार संबंधित कर्मचार्‍यांना त्याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर दिली जाईल, अशी माहिती समजली.
भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

Back to top button