नगर ग्रामपंचायत Live : संगमनेर : 37 पैकी 20 ग्रामपंचायतीचे सरपंचपद आमदार बाळासाहेब थोरात गटाकडे

नगर ग्रामपंचायत Live : संगमनेर : 37 पैकी 20 ग्रामपंचायतीचे सरपंचपद आमदार बाळासाहेब थोरात गटाकडे
Published on
Updated on

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या 37 ग्रामपंचायत पैकी 20 ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहे. त्यामध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गटाचे  12 सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले आहे.  तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचे 8 सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले आहे.

काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाचे खराडी वाघापूर जांभुळवाडी दरे वाडी कर्जुले पठार जांबुत बुद्रुक अंभोरे निळवंडे करुले ओझर खुर्द उंबरी बाळा पुर हंगेवाडी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहे. तर विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचे निमोण कोल्हेवाडी मालुंजे जोर्वे निंबाळे रहिमपूर कनकापूर सादतपूर पाच सरपंच पदाचे उमेदवार विजयी झालेले आहेत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news